दक्षिणा १
हिमालयातील एका उंच शिखरावर एक योगी सूर्याकडे शांत , आदर भावनेने पाहत होता . कदाचित तो आंतरिक धन्यवाद देत असेल . त्या सृष्टीच्या चालकाला . पाठमोऱ्या बाजूने भगवी वस्त्र घातलेला योगी एक तेजस्वी व्यक्ती वाटत होता . तो ध्यानस्थ होता कि त्राटक करत होता ह्ये लांबून कळत नव्हतं . जवळच्या ग्रामस्थांन कडून असा कळले कि ह्ये योगी खूप वर्ष्यापासून इथेच वास्तव्य करत आहेत . आम्ही हळू हळू त्यांच्या बसलेल्या ठिकाणी जाऊ लागलो . थंड हवा वाहत होती आणि त्या हवेत त्यांचे थोडे पांढरे झालेले डोक्यावरचे केस उडत होते . आम्हाला असे कळले कि ते कोणाशी जास्त बोलत नसत आणि नाही काही मागत असत , ना जेवण ना चहा ना नाश्ता ना या थंडी तुन वाचण्यासाठी कांबळ एक शांत स्वतः मध्ये विलीन झालेला योगी , आम्ही त्यांच्या जवळ जाऊन पोहचलो . त्यांनी आम्हाला पहिला आणि स्मित हास्य केल. आम्ही दर्शन करण्यासाठी वाकलो तर त्यांनी तसे करण्यास मौन नकार दिला आणि सुर्याकडे बोट दाखवलं . आम्ही बराच वेळ त्यांच्या जवळ बसून राहिलो , पण ते काहीच बोलले नाही , सेल्फी आणि फोटोग्राफी ची आवड असणाऱ्यांनी त्यांचे वेगवेगळ्या अँगल ने फोटो काढले होते . ते खूपच तेजस्वी होते , त्यांच्या चेहऱ्यावर एक पराक्रमी रुबाब होता एखाद्या सम्राटासारखा मला नक्कीच खात्री झाली होती ते या सन्यास घेण्याअगोदर कोणी तरी ग्रेट व्यक्ती असणार , मी अंतकाराने दर्शन घेतले आणि निघालो . पण त्यांचा चेहरा माझ्या डोक्यातून जात नव्हता , खूपच तेजस्वी.… मला खूप काही जाणून घ्यायचा होता त्यांच्या कडून , आज काल प्रसारमाध्यमामध्ये ढोंगी , सोंगी , फौंडेशन वाले खूप साधू लोक झाले होते . फक्त लोकांना बोलण्यात गुंग करणारे पण मनात वेगळाच काळाबाजार करणारे ह्ये स्वघोषित संत समाज्याला चुकीचे दिशा देत होते मी ह्ये जाणून घेत होतो . पण ह्ये वेगळेच वाटले यांच्यात प्रखर सत्य दिसत होत . माझे मन राहवत नव्हत. तरी स्वतःच्या रेस्पॉन्सिबिलिटी ला पाहून मी निरोप घेतला .
माणसं ओळखन्याचे खर तंत्र मी माज्या वडिलांकडून शिकलो होतो . आणि माझे वडील त्यांच्या गुरुंन कडून मी खूपदा त्यांच्या कडून त्यांच्या गुरूंचे कौतुक ऐकले होते . माझे वडील लष्करात मोठे अधिकारी होते . गुरु वैगैरे अश्या गोष्टी ते मानत असतील असे सहजासहजी वाटत नसेल पण त्यांच्या त्यांच्या गुरुं वर खूप ट्रस्ट आणि श्रद्धा होती . एकदा मी त्यांना सहज विचारल तुम्ही सतत तुमच्या गुरूंचे गुणगान करता मग जसे लोक घरोघरी आपापल्या गुरूंचे फोटो लावतात मग तसा तुम्ही का नाही लावला ? त्यांनी स्मित हास्य केल आणि बोलले माझे गुरु कोणी बाबा वगैरे नाही माझे गुरु ज्यांनी मला शिकवलं आज मी जो कोणी आहे तो त्यांच्या मुळे ज्ञानाचा महासागर होते आमचे सर .…. देव , धर्म , देश , सुशाषण , बुद्धी , विवंचना , वाचा मानस कर्मणा , धार्मिकता , गणित , स्वभावशाश्त्र अनेक गोष्टी आम्ही शिकलो . मी त्यांना पाहिल्यान्दा एवढ आपुलकीने आणि आदराने बोलताना पाहत होतो . मी त्यांना विचारला त्यांचा फोटो आहे का तुमच्या सोबत तर त्यांनी त्यांची जुनी फाईल काढली त्यात एक कंप्लेंट ग्रुप फोटो होता आणि तो फोटो मध्ये माज्या वडिलांसोबत त्यांच्या गुरूंचा फोटो होता आणि मी क्षणभर स्तब्ध झालो , कारण मी ज्या ट्रिप वरून आलो होतो ते संन्यासी आणि माज्या वडिलांच्या गुरूंचा चेहरा अगदी मिळत होता , मी फोटो हातात घेऊन पळत बेडरूम मध्ये ठेवलेला कॅमेरा घेऊन आलो आणि त्या संन्याशाच्या फोटो वडिलांना दाखवला आणि ते सुद्धा अचानक स्तब्ध झाले जणू काही शॉक बसला त्यांना सुद्धा , त्यांनी पटकन मला विचारला तुला ह्ये कुठे मिळाले फोटो कोठे काढलास , मी पहिल्यांदा वडिलांना एवढ्या गडबडीत विचारताना पहिला आणि सुरवात झाली एका महान व्यक्तीच्या कहाणीची.…
Comments
Post a Comment