दक्षिणा १ हिमालयातील एका उंच शिखरावर एक योगी सूर्याकडे शांत , आदर भावनेने पाहत होता . कदाचित तो आंतरिक धन्यवाद देत असेल . त्या सृष्टीच्या चालकाला . पाठमोऱ्या बाजूने भगवी वस्त्र घातलेला योगी एक तेजस्वी व्यक्ती वाटत होता . तो ध्यानस्थ होता कि त्राटक करत होता ह्ये लांबून कळत नव्हतं . जवळच्या ग्रामस्थांन कडून असा कळले कि ह्ये योगी खूप वर्ष्यापासून इथेच वास्तव्य करत आहेत . आम्ही हळू हळू त्यांच्या बसलेल्या ठिकाणी जाऊ लागलो . थंड हवा वाहत होती आणि त्या हवेत त्यांचे थोडे पांढरे झालेले डोक्यावरचे केस उडत होते . आम्हाला असे कळले कि ते कोणाशी जास्त बोलत नसत आणि नाही काही मागत असत , ना जेवण ना चहा ना नाश्ता ना या थंडी तुन वाचण्यासाठी कांबळ एक शांत स्वतः मध्ये विलीन झालेला योगी , आम्ही त्यांच्या जवळ जाऊन पोहचलो . त्यांनी आम्हाला पहिला आणि स्मित हास्य केल. आम्ही दर्शन करण्यासाठी वाकलो तर त्यांनी तसे करण्यास मौन नकार दिला आणि सुर्याकडे बोट दाखवलं . आम्ही बराच वेळ त्यांच्या जवळ बसून राहिलो , पण ते काहीच बोलले नाही , सेल्फी आणि फोटोग्राफी ची आवड असणाऱ्यांनी त्यांचे वेगवेगळ्...
Posts
Showing posts from October, 2023
How to prepare for NDA & NA?
- Get link
- X
- Other Apps

बारावी नंतर संरक्षण दलातील अधिकारी होण्याच्या संधी ….. लष्कर म्हणजे एक रुबाब , एक असा युनिफॉर्म ज्याला पाहिल कि आतूनच रिस्पेक्ट तयार होतो त्या व्यक्ती विषयी आत्मियता आणि प्रेम आणि त्याच्या परिपूर्णतेवर विश्वास तयार होतो . देशाची एक सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते . अश्या लष्कराचा एक भाग होण्याचा अनेक युवकांना आवड असते . जवळ जवळ १२ लाख सैनिकांची फौज आपल्या भारताला लाभली आहे . भारतीय सरंक्षण दलात अनेक ठिकाणी युवकांना संधी आहेत . सैनिक म्हणून पण युवक लष्करात सेवा बजावू शकतात . तसेच अधिकारी म्हणून सुद्धा युवक लष्करात सेवा देऊ शकतात . आज मी संरक्षण दलातील लष्करी अधिकारी आपण कस होऊ शकतो ? यावर मार्गदर्शन करणार आहे . करिअरच्या दृष्टिकोनातून तरुणांसाठी एनडीए हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण, एनडीएची तयारी कशी करायची यासाठी उत्साह आणि धाडस आवश्यक आहे जे तरुणांमध्ये मुबलक आहे. अनेक विद्यार्थी 10वी पूर्ण करून NDA मध्ये जाण्याची उत्सुकता दाखवतात ज्यातून NDA मध्ये सामील होऊन देशाची सेवा करता...