Preparation of NEET & JEE

     मागील  २ वर्ष आपण मोठ्या आपत्ती सोबत लढतोय . डॉक्टर्स , नर्स  , पोलीस , शेतकरी सर्वानी खूप छान आपआपली धुरा सांभाळली . आपण थोडा सावरतोय आणि लवकर आपण यातुन बाहेर येऊ असा आपण विश्वास ठेवूयात . या दोन वर्षायात मुलांनी पण खुप  गोष्टी लॉस केल्या . त्यातील  एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाची सवय ...... 

  अभ्यास म्हणजे काय ? अभ्यास आणि त्याची सवय तुम्हाला जगात यशस्वी  बनवत  असते . तुमच्या मधील तर्क बुद्धीचा विकास करून गोष्टींना शुद्धपणे  समजणे व  आत्मसात  करणे म्हणजे अभ्यास .  एक चांगला डॉक्टर इंजिनीर  बनण्यासाठी तुमच्या कडे शुद्ध ज्ञान  असणं आवश्यक आहे . ज्ञान  आत्मसात करणं हेच विद्यार्थ्याच लक्ष्य असायला पाहिजे . 

 आज हा लेख सगळ्या मुलांसाठी आहे जे NEET / JEE  PREPARATION  करत  आहेत .

१)  सगळ्यात अगोदर तुमच्या मनातून हि भीती काढून टाका कि NEET / JEE  EXAM  खूप हार्ड आहे .

२) कोणतीही एक्साम कठीण तेंव्हा  असते जेंव्हा त्या  एक्साम चे QUESTIONS तुम्हाला समजत नाहीत . 

३) QUESTIONS तुम्हाला कधी  कळतील जेंव्हा तुम्ही कन्सेप्ट ला समजून  अभ्यास कराल . 

४) कन्सेप्ट  कळण्यासाठी वेळ लागणार पण तो वेळ वाया गेला असा  कधीच समजू नका . 

५) SYLLABUS  कंप्लेंट करण्याच्या मागे नका धावू . 

६) तुम्ही जर एक जरी कन्सेप्ट छान समजून घेतली तर त्या कन्सेप्टच्या बेसिस वर तुम्ही खूप सारे         QUESTIONS SOLVE करू शकता . 

७) तुम्ही डेटा (DIFFERENT  PUBLICATION BOOK , COACHING  NOTE )  गोळा करण्यात वेळ नका   वाया घालवू . 

८) तुमचे TEXT BOOK  याच बेस्ट नोट्स आहेत . 

९) CHAPTER  मधील एक एक वाक्याचा MEANING  तुम्हाला नीट समजू घेतला पाहिजे . 

१०)तुम्हाला  स्वतः QUESTIONS  तयार करता  आले पाहीजे . 

११) एका CHAPTER वर कमीत कमी ३०० QUESTIONS तयार केले पाहिजे . 

१२) मिलिटरी सायकॉलॉजि बनवा NEET / JEE   तुमच्यावर  कोणत्या   QUESTION च मिसाईल टाकेल त्या अगोदर तुम्ही तुमचा अँटी मिसाईल  तयार ठेवा . 

१३) तुमचा मोटिवेशन  HIGH पाहिजे . 

१४) स्पोर्ट मध्ये पण पार्टीसिपेट करा . 

१५) ११ वी  आणि १२ वी हे  २ वर्ष सुरुवातीपासून अभ्यास करा . 

१६) ३ महिन्यांचा क्रॅश कोर्से करून कोणीही NEET  आणि  JEE  चा टॉपर बनत नाही हे ठाम  लक्ष्यात ठेवा . 

१७) अभ्यासाचा नियोजनं  करायला शिका . 

१८)  दररोज STUDY  DIARY  लिहा . 

१९) टार्गेट ओरिएंटेड स्टडी करा . टार्गेट कंप्लेंट करण्याची सवय लावा . मेहनत करा . 

२०) तुम्ही सतत तुमच्या अडचणी डिस्कस करा . प्रश्न विचारा . 

स्टडी RELATED  तुमच्या अडचणींना  मी तुम्हाला नक्की हेल्प करेल . 

                चैतन्य सर 

    founder of  AMBITIOUS SUCCESS POINT  

  पद्मालय ओमकार सोसायटी  कात्रज ८८५७८८४६९९ 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Ambitious Success Point

How to prepare for NDA & NA?

AFCAT (1) 2024 Notification [Eligibility, syllabus and exam date] By Chaitanya sir